आपल्या पतसंस्थेविषयी

“ विना सहकार, नाही उद्धार ” हे ब्रीद घेऊन सुरु झालेली तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पाली, ता. जि. रत्नागिरी. या संस्थेची स्थापना दिनांक ०५/०४/१९९९ रोजी रत्नागिरी येथील पाली येथे अगदी छोट्याशा जागेत झाली. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. तुकाराम (आण्णा) बाबु पालकर यांच्या पश्चात श्री. नितीन रामा कांबळे पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी संस्थेला खऱ्या अर्थाने बळ व उर्जितावस्था प्राप्त करून दिली. हळू हळू तक्षशिलाच्या आर्थिक प्रगतीला सुरुवात झाली. थोड्याच कालावधीत तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची प्रगतीची घोड दौड मोठ्या प्रमाणात सुरु झाली. संस्था या वर्षी रौप्य महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. संस्थेच्या चांदेराई, खेडशी व जाकादेवी ह्या तीन शाखा उत्कृष्टरीत्या कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी तालुका आहे.
संस्थेला सन २०२२ – २०२३ अखेर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा “ दीपस्तंभ ” पुरस्कार प्राप्त झाला आहे, आविज पब्लिकेशन यांचा ” बँको ब्लू रिबन पुरस्कार” प्राप्त झाला आहे. तसेच दैनिक नवराष्ट्र सन्मान “ आदर्श पतसंस्था ” पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संस्था आर्थिक व्यवहारात सातत्याने ऑडीट “अ” वर्ग राखण्यात यशस्वी झाली आहे

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

दिपस्तंभ पुरस्कार 2023-24

विदर्भ क्रेडिट को ऑप सोसायटीज फेडरेशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने

जिल्हास्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार - 2023

बँको ब्लू रिबन पुरस्कार - 2024

Scroll to Top
Open chat
1
Scan the code
नमस्कार,
तुम्हाला काही मदत हवी का?